भोसरी - आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून वेळेचे योग्य नियोजन करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर निश्चित ध्येय साध्य करता येत असल्याचे घरची परिस्थिती बिकट असताना आणि कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात सीए झालेला स्वरूपकुमार बिरंगळ सांगत होता..मूळचे अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथे राहणारे बिरंगळ कुटुंबीय चरितार्थासाठी भोसरीतील आदिनाथनगरमध्ये आले. स्वरुपकुमार नऊ वर्षांचा असताना २०११ मध्ये त्याच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. बिरंगळ कुटुंब अंत्यविधीसाठी गावाकडे गेले असताना चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातील भांड्यांसह सर्व साहित्य चोरुन नेले होते. स्वरूपकुमारची आई मीना या भोसरीत आल्या, तेव्हा त्यांना स्वयंपाक बनविण्यासाठीही भांडी चोरट्यांनी ठेवली नव्हती..घरचा करता पुरुष गेल्याने मीना यांनी उदरनिर्वाहासाठी शिकवणी वर्ग सुरू केले. स्वरुपकुमारला इंग्रजी किंवा सेमीइंग्रजी माध्यमात टाकण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, पैशाअभावी त्यांना ते जमत नव्हते. तेव्हा त्यांनी मंगळसूत्र विकून स्वरुपकुमारला सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला..परिस्थिती ओळखून स्वरुकुमारनेही चिकाटीने अभ्यास करत शाळेतील परीक्षेतही उत्कृष्ट गुण मिळवत आपली हुशारी दाखविली. मीना यांनीही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे स्वरुपकुमारने कोणतेही खासगी क्लास न लावता घरी आॅनलाईन अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात सीएची परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली..घरच्या गरिबीच्या परिस्थितीची जाणीव स्वरूपकुमारला लहानपणापासूनच असल्याने त्याने कधीही कोणता हट्ट केला नाही. दहावीपर्यंत शाळेतही त्याने वर्गात पहिला क्रमांक मिळवला आहे. दिवसाचे बारा तास तो अभ्यास करायचा. बारावीपासूनच त्याने सीएच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. पदवी आणि सीएच्या परीक्षेचा एकत्रित अभ्यास त्याचा सुरू होता. घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत त्याने मिळविलेल्या यशाचे समाधान आहे.- मीना बिरंगळ-आखाडे, स्वरूपकुमारची आई.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.