तिसऱ्या लाटेविरुद्ध पिंपरी चिंचवडमध्ये यंत्रणा सज्ज - राजेश पाटील

कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर वायसीएम रुग्णालयात दोनशे बेड व आयसीयू तयार ठेवा.
Rajesh Patil
Rajesh PatilSakal

पिंपरी - कोरोना संसर्गाची (Coronavirus) संभाव्य तिसरी लाट (Third Wave) लहान मुलांसाठी (Child) घातक (Danger) ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) दोनशे बेड व आयसीयू तयार ठेवा. नवीन जिजामाता रुग्णालय, मासूळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय व पिंपरीतील (Pimpri) म्हाडा इमारतीत कोविड सेंटर (Covid Center) सुरू केले जाणार आहे. तसेच, शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर व रुग्णालयांचीही मदत (Help) घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली. (System ready in Pimpri Chinchwad against the third wave Rajesh Patil)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी वैद्यकीय सेवा सुसज्ज ठेवण्याबाबत आयुक्त पाटील यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याची शक्यता असल्याने वायसीएम रुग्णालयात दोनशे बेड ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येकी १५ बेडचे दोन आयसीयू तयार ठेवण्यात येणार आहेत. नवीन जिजामाता रुग्णालय लहान मुलांसाठी तयार करून तिथे १०० ऑक्सिजन बेडची सोय असेल. मासूळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था असेल.

Rajesh Patil
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

आज कोविशिल्डचा फक्त दुसरा डोस

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर बुधवारी १० हजार ५०९ लाभार्थींना लस देण्यात आली. गुरुवारी (ता. १३) फक्त ४५ पेक्षा अधिक वयोगटातील लाभार्थींना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस शंभरच्या क्षमतेने सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिला जाणार आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण केले जाणार नाही, असे महापालिकेने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com