

Pimpri
esakal
पिंपरी: देहू आळंदी मार्गावरील तळवडे येथे महापालिका हद्दीत प्रवेश करताना महापालिकेकडून कमान उभारण्यात येत आहे. या कमानीच्या कामाला तब्बल चार वर्षांचा कालावधी उलटत आला तरी काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही. सुरुवातीला या कामाची मुदत दोन वर्षे असताना वारंवार मुदतवाढ मिळूनही हे काम अर्धवट स्थितीतच असून, केवळ पन्नास टक्केच पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर आला असताना या रखडलेल्या कामामुळे रहदारीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.