तळेगाव स्टेशन - तळेगाव ते चाकण २८ किलोमीटर लांबीमध्ये चार पदरी उन्नत मार्गासह जमिनीस समांतर चारपदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापुर २५ लांबीमध्ये जमीनीस समांतर सहा पदरी रस्ता करणे, ही कामे महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फ़त हाती घेण्यास गेल्या २२ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी (ता. २१) महाराष्ट्र शासनाचे उपसचिव निरंजन तेलंग यांनी अधिकृत अध्यादेश जारी केल्यामुळे या कामावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.