

The Talegaon Dabhade municipal election features a high-stakes triangular contest for the mayor’s post
Sakal
तळेगाव स्टेशन : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ३ उमेदवारांमध्ये तर नगरसेवक पदाच्या ९ जागांसाठी एकूण २३ उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार आहे.विरोधात एकही अर्ज शिल्लक न राहिल्याने नगरसेवकपदाचे एकूण १९ उमेदवार बिनबिरोध निवडून आले आहेत. पुणे जिल्ह्यात महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे विरुद्ध किशोर छबुराव भेगडे आणि अँड.रंजना रघुनाथ भोसले अशी तिरंगी लढत होणार आहे.