Pimpri : तळवडी चौक बनला मृत्यूचा सापळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवडी चौक बनला मृत्यूचा सापळा

तळवडी चौक बनला मृत्यूचा सापळा

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौक येथे रविवारी (ता.२१) सायंकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. येथे आतापर्यंत अवैध पार्किंग केल्यामुळे गंभीर अपघात केल्याने अनेकांचे बळी गेले आहेत. यामुळे इलाईट ते तळवडी चौकातील महामार्ग परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे.

बेजबाबदार वाहनचालकांवर महामार्ग प्रशासन, पोलिस कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्ते सुरक्षेसाठी नेमलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी वाहनांवर नियंत्रण ठेवण्याकडे काणाडोळा करीत असल्याने अपघातांच्या घटना वाढत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक करीत आहेत.

सोलापूरच्या दिशेने येणारी वाहने अडवण्यासाठी लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलिस चौकापासून १०० ते १५० मीटर अंतरावर उभे राहून, वाहनचालकांकडून पावती फाडत असतात. मात्र, इलाईट चौक ते तळवडी चौक दरम्यान महार्गावर तासांनतास बेकायदा वाहने उभी असतात. त्या वाहनांच्या चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिस दिसत नाहीत. मात्र, सोलापूर, यवत, दौंडकडून येणारे शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यावर कारवाईसाठी वाहतूक पोलिस पुढाकार घेतात.

loading image
go to top