बजाजनंतर आता टाटा मोटर्समध्येही हे पाऊल उचलण्यात आलंय

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

- प्रायोगिक तत्वावर कामगारांना काढा देणे चालू 

पिंपरी : आकुर्डी येथील बजाज ऑटो पाठोपाठ टाटा मोटर्समध्येही रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यादृष्टीने कर्मचारी-अधिकारी वर्गासाठी प्रायोगिक तत्वावर प्रत्येक पाळीच्या दुसऱ्या चहाऐवजी आयुर्वेदिक काढा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याला कामगार वर्गाचीही चांगली पसंती मिळत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

काही दिवसांपूर्वीच आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये सर्दी-खोकल्यापासून बचाव आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक पाळीत पहिल्या चहाऐवजी कामगार-अधिकारी वर्गाला दिवसामधून एकदा आयुर्वेदिक काढा देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, पुणेनेही (सीव्हीबीयू) प्रायोगित तत्वावर आयुर्वेदिक काढा देण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ६६ जणांना डिस्चार्ज, तर आतापर्यंत एवढे रुग्ण झाले बरे

-------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

-------------------------------------------------------------------------------------

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बजाज कंपनीत दालचिनी, काळीमिरी, सुंठ, मनुके, गुळ आणि पाणी यापासून काढा तयार करुन तो दिला जात आहे. मात्र, टाटा मोटर्समध्ये त्यात थोडा बदल करण्यात आला आहे. आले, गुळ, लवंग, दालचिनी, तुलसी, काळीमिरीचा काढ्यासाठी वापर केला जात आहे. सध्या टाटा मोटर्समध्ये सकाळी 6.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंतची पहिली पाळी चालू झाली आहे. तर त्यातील कामगारांना जेवणानंतर तासाभराने दुपारी दीड वाजता काढा दिला जात आहे. सध्या दुसरी पाळी बंद आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे, त्यांनाही काढा दिला जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भविष्यकाळात तत्कालीन बदलत्या परिस्थितीनुसार चहा पूर्ववत चालू केला जाईल, असे टाटा मोटर्स व्यवस्थापनाने कामगारांसाठी प्रसिद्ध केलेल्या सूचनेत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tata motors gives syrup for employees