esakal | जुन्या सायकलची बनवली इलेक्ट्रिक बाईक; कामशेतच्या शिक्षकाची कमाल
sakal

बोलून बातमी शोधा

teacher form Kamshet made Electric bike made of old bicycle

इलेक्ट्रॉनिक्स, अॅटो टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हेच विषय त्याचे तोंडपाठ असल्यामुळे इलेक्ट्रिक सायकल तयार करण्याचे ठरवले. त्यांनी जुनी सायकलची इलेक्ट्रिक बाईक तयार करण्याचे ठरविले.

जुन्या सायकलची बनवली इलेक्ट्रिक बाईक; कामशेतच्या शिक्षकाची कमाल

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कामशेत : सायकल भंगारात विकायला काढली होती; पण अंतर्मन तयार होत नव्हते म्हणून त्यांनी ती सायकल विकली नाही. तिलाच इलेक्ट्रिक बाईक बनवली. आज ते रोज त्याच बाईकवरून प्रवास करत आहेत. लॉकडाउनमध्ये प्रवासी वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली. इंधन बचतीवर पर्याय म्हणून यावर टेक्निकलच्या शिक्षकांनी मार्ग काढला. या शिक्षकाचे नाव विलास भोसले असे आहे. कामशेतच्या पंडित नेहरू विद्यालय व ज्युनिअर कॉलेजात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागात इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी शिकवतात. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखांमध्ये १९९९ पासून भोसले हेच विषय शिकवीत आहेत. आज त्यांचे बरेच विद्यार्थी उद्योजक आहेत. व्यवसाय शिक्षण काळाची गरज ओळखून या संस्थेने विविध ठिकाणी, असे कोर्सेस सुरू केले आहेत. 

पिंपरी चिंचवडमधील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

इलेक्ट्रॉनिक्स, अॅटो टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हेच विषय त्याचे तोंडपाठ असल्यामुळे इलेक्ट्रिक सायकल तयार करण्याचे ठरवले. त्यांनी जुनी सायकलची इलेक्ट्रिक बाईक तयार करण्याचे ठरविले. त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून सर्व माहिती गोळा करून साहित्य ऑनलाइन खरेदी केले. सुरुवातीला अडचणी आल्या; पण व्हील अलायमेंट करून इलेक्ट्रिक बाईक तयार केली.-

बाईक बनविण्यासाठी खर्च (रु.) 
- रिअर हब मोटर ११००० 
- बॅटरी व चार्जर रुपये ९००० 
- जुनी सायकल रुपये ४००० 
- एकूण रुपये २४००० एवढा खर्च आला. 

हे वाचा - प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस

रिचार्जचा खर्च चार रुपये 

खर्चात अजूनही बचत होऊ शकते. त्यासाठी वेगळी मोटर व बॅटरी वापरावी. ही बाईक ताशी ३० किमी वेगाने धावते. एका रिचार्जमध्ये ३५ किलोमीटर जाते. आणि जर पेंडेलचा वापर केला तर डबल अंतर जाते. ७० किलोमीटरवरून १२५ किलो वजन नेहते. रिचार्जच खर्च ४ रुपये आला. 
 
स्वतः मी माझ्या राहत्या घरापासून खराडी, चंदननगर येथून कामशेतला दोन तास २० मिनिटात पोहोचलो. एक बाजूचे अंतर ५५ किलोमीटर आहे. माझी दैनंदिन कामे या सायकलचा वापर करूनच करतो. इंधन बचतीचा चांगला पर्याय आहे. 
- विलास भोसले, टेक्निकल, शिक्षक, कामशेत

loading image