esakal | ...असा झाला व्हॉट्सअॅपवर सेवापूर्ती कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

...असा झाला व्हॉट्सअॅपवर सेवापूर्ती कार्यक्रम

- लॉकडाउनमुळे व्हॉट्सअॅपवर निरोप समारंभ घेण्याची कल्पना मांडण्यात आली

...असा झाला व्हॉट्सअॅपवर सेवापूर्ती कार्यक्रम

sakal_logo
By
मिलिंद संधान

नवी सांगवी : दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेतील शिक्षिकांनी आपल्या सहकारी भगिनीचा सेवापूर्ती कार्यक्रम ऑनलाइन साजरा करून कृतज्ञता व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रशालेतील शिक्षिका बेबीताई कुंभार या मे महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, लॉकडाउमुळे त्यांचा निरोप समारंभ राहून गेला. पण शाळेतील सांस्कृतिक विभाग पाहणाऱ्या कल्याणी कुलकर्णी यांनी व्हॉट्सअॅपवर हा निरोप समारंभ घेण्याची कल्पना सहकारी शिक्षिकांपुढे मांडली.  त्यानुसार ठरलेली तारीख आणि वेळेनुसार उपप्राचार्या अंजली घोडके यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपवर ऑनलाइन आल्या.

गाडी निघाली...पत्नीला फोन केला...अन् अश्रूंचा बांध फुटला

वर्षा खरात यांनी समईचे चित्र ग्रुपवर टाकल्यावर अध्यक्षा घोडके यांनी दिव्याची इमोजी ग्रुपवर टाकली. त्यानंतर सूत्रसंचालन करणाऱ्या कल्याणी कुलकर्णी यांनी सूचना करताच सरस्वतीची प्रतिमा ग्रुपवर टाकले. प्रतिमेचे पूजन मंगला हजारे यांनी फुलांची इमोजी टाकून केले. त्यानंतर पुष्पा तिजोरे व स्मिता रघतवान यांनी सर्वांना कार्यक्रमाचे बॅज दिले. त्यानंतर शारदा जगदाळे यांनी ध्वनीमुद्रीत केलेले प्रास्ताविक ग्रुपवर सादर केले. कुंभार यांच्या बद्दल प्रत्येकीने आपले ध्वनीमुद्रीत विचार ग्रपुवर शेअर केले, तर काहींनी लिखीत स्वरूपात मांडले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ग्रुपमधिल सर्वात तरुण शिक्षिका शितल देशमुख सर्वांना अधूनमधून मार्गदर्शन करीत होत्या. सेवानिवृत्त होणाऱ्या कुंभार मॅडम यांना मोबाईलमधील जास्त कळत नसल्याने त्यांनी आपल्या मुलीच्या मदतीने फोन हाताळला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा घोडके यांनीही आपले ध्वनीमुद्रीत सादर केले. कार्यक्रम समारोपाकडे चालला असताना शितल यांनी सर्वांना चहा (कपबशीच्या इमोजी) दिल्या. तर विद्या रणधीर यांनी बुंदीची इमेज टाकून सर्वांचे तोंड गोड केले. साधारण एक तास चाललेल्या या कार्यक्रमाचे आभार वर्षा गिराम यांनी मानले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत व्हर्च्युअल का होईना सगळ्या जनी एकत्र येऊन कार्यक्रम घेतल्याचा आनंद सर्वांना झाला. परंतु प्रत्यक्ष कधी भेट होणार, ही ओढ प्रत्येकीलाच होती.   
 

loading image
go to top