esakal | निवृत्त एसीपी असल्याचे खोटे सांगत शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

निवृत्त एसीपी असल्याचे खोटे सांगत शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : व्याजाने पैसे देतो, असे सांगून घरी बोलावलेल्या शिक्षिकेला सॉफ्टड्रिंक देऊन लैंगिक अत्याचार केला. अश्लील फोटो काढले. 'कोणाला काही सांगितले तर मारून टाकीन, मी रिटायर एसीपी आहे, माझे कुणीही वाकडे करू शकत नाही', अशी धमकी दिली. दरम्यान, एसीपी असल्याचे खोटे सांगत अत्याचार केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

विकास अवस्ती (वय ६० : रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीला आर्थिक अडचण असल्याने त्यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून आरोपीने त्यांना घरी बोलावून घेतले. दोन कोरे धनादेश व कागदावर सह्या घेऊन त्यांना सॉफ्टड्रिंक दिले. लैंगिक अत्याचार करीत अश्लील फोटो काढले.

त्यानंतर पैसे न देता फिर्यदिला पाठवले. त्यानंतर फिर्यादीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना पुन्हा आरोपीने घरी नेले. 'तू जर ओरडलीस व कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, मी रिटायर एसीपी आहे, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही' अशी धमकी देत फिर्यादीवर अत्याचार केला.

दरम्यान, आरोपीने आपण एसीपी असल्याचे खोटे सांगत फिर्यादीला धमकी दिल्याचे समोर आले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी बलात्कारासह महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top