

Diwali Firecrackers Cause 'Poor' Air Quality in Pimpri
Sakal
पिंपरी : शहरात दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनला शहरातील हवेचा दर्जा लक्षणीय खालावला होता. प्रामुख्याने फटाक्यांचा धूर, वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रांमधील उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढले.
मात्र, यानंतर पडलेल्या पावसाने प्रदूषणाचा प्रभाव कमी झाला असून, हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीतून ‘मध्यम’ स्तरावर परत आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.