esakal | धार्मिक स्थळे उघडताच भाजपकडून महाआरती आणि आनंदोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

bjp pimpari

राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शन व प्रार्थनेसाठी खुली झाली.

धार्मिक स्थळे उघडताच भाजपकडून महाआरती आणि आनंदोत्सव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शन व प्रार्थनेसाठी खुली झाली. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या देवळांमध्ये घंटानाद व आरतीचे स्वर घुमले. भाजप पदाधिकाऱ्यांनी मंदिरांमध्ये जाऊन पूजा व आरती केली.

चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधीवर भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांना पेढे वाटून ‘आनंदोत्सव’ साजरा केला.

पिंपरी - चिंचवडमधील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाआरती करण्यात आली आणि आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी भाजप प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, सरचिटणीस नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते  ‘महाआरती व आनंदोत्सवात’ सहभागी झाले होते.

हे वाचा - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे यश; शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर  तब्बल नऊ महिन्यानंतर सर्वधर्मीय मंदिरे उघडण्यात आली आहेत. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर ते चिंचवड येथील मोरया गोसावी संजी मंदिरापर्यंत फेरी काढली. भोसरी मतदार संघातील सर्व ग्रामदैवते असा दर्शन-आरती प्रवास केला. यावेळी जोगेश्वरी महीला भजनी मंडळांच्या महीला व मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक सहभागी झाले होते.