तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करा; सोमय्यांचे नांगरे पाटलांच्या पत्नीवर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya
ठाकरे सरकारने महाराष्ट्राला अक्षरशः लुटले; किरिट सोमय्या

तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करा: किरीट सोमय्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - किरीट सोमय्यांनी आज पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार व कुटुंबीयांसह नातेवाईकांचा सहभाग आहे. असाच प्रकार जालना सहकारी साखर कारखान्यात झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटलंय की, शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर आणि मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पत्नी रुपाली व सासरे पद्माकर मुळ्ये आणि तापडिया बिल्डर यांच्यात हा ४३ कोटी २५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. शिवाय, या प्रकरणाची चौकशी करून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला. याबाबत आपण उद्या दिल्लीत जाऊन ईडी, प्राप्तीकर खाते, कंपनी व्यवहार मंत्रालय व सहकार मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘राज्यातील ठाकरे सरकारला २३ महिने झाले आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः लुटले आहे. कोविड काळात उपचाराअभावी जनता मृत्यूमुखी पडत असताना सरकार भ्रष्टाचाराचे पैसे मोजत होते,’’ असा घणाघाती आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी रविवारी पिंपरीत केला.

भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘महावसुली सरकारचे घोटाळे’ ही पुस्तिका माध्यमांना देऊन घोटाळेबाजांना सजा झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

हेही वाचा: लोणावळ्याचा राष्ट्रपतींकडून गौरव

गेल्या २३ महिन्यात ठाकरे सरकारने २४ घोटाळे केले आहेत. त्यांचा पाठपुरावा राज्य व केंद्र सरकारसह उच्च न्यायालय, लोकायुक्त, मानव अधिकार आयोग, राष्ट्रीय हरित लवाद, ट्राय, अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग यांच्याकडे सुरू आहे, असे सांगून सोमय्या म्हणाले, ‘‘गांजा व ड्रग्जला हर्बल वनस्पती म्हणण्याचा शरद पवार यांचा उद्देश काय होता? आयात दारूवर पन्नास टक्के कर कमी केला, त्याच्याशी याचा संबंध आहे का? याचे उत्तर पवार व मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यायला हवे. त्यांनी पेट्रोलवरील ३० टक्के कर कमी केल्यास राज्यात ते स्वस्त होईल. केंद्र सरकारप्रमाणे कर कमी केला आहे.’’

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचे खोटे सांगून राज्य सरकारमधील तीनही पक्षांचे नेते नौटंकी करत आहेत. त्यांचे मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रतार सननाईक, अजित पवार यांची नावे घेऊन सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले.

loading image
go to top