जुनी सांगवीतील शवदाहिनी 
चार दिवस राहणार बंद

जुनी सांगवीतील शवदाहिनी चार दिवस राहणार बंद

पिंपरी, ता. १६ ः जुनी सांगवी येथील वसंतदादा पाटील पुतळा व बस स्थानकासमोर उभारलेल्या महापालिकेच्या सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ­­­­शवदाहिनी चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ यांनी दिली.
जुनी सांगवी येथील सीएनजी गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कारासाठी विविध ठिकाणाहून नागरिक येतात. सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाला आहे. शवदाहिनी चालन, देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट एनवायसी एंटरप्रायझेस यांच्याकडे आहे. त्यांच्यामार्फत दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यास चार दिवस लागणार आहेत. त्यामुळे शवदाहिनी चार दिवस बंद राहील, असे धुमाळ यांनी सांगितले.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com