Pimpri : सायकलवारीतून निसर्गाचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकलवारीतून निसर्गाचा संदेश

सायकलवारीतून निसर्गाचा संदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कन्याकुमारी सायकल प्रवास प्रत्येकजण करण्याचे स्वप्न पाहतो. आॕगस्ट महिन्यात सायकल मित्र संदीप नांदापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावरून वयाची चाळीशी आणि पन्नाशी गाठलेल्या सहा जणांनी सायकल प्रवासाला सुरवात केली. त्याचबरोबर प्लॅस्टिक हे पर्यावरणाला घातक असून निसर्गाची काळजी घेण्याचा संदेश कन्याकुमारी सायकलसवारीत सायकलप्रेमींनी दिला.

७ नोव्हेंबरपासूनच्या प्रवासात अजय मते, विमा प्रतिनिधी (वय ५०) सुरेश खर्से, रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंन्ट अधिकारी (वय ४७) भालचंद्र रानवडे, अॕम्युनिशन फॕक्टरी कर्मचारी (वय ५८) पोपट जगताप, पवना सहकारी बँक शाखा व्यवस्थापक (वय ४६) विकास सांडभोर, निवृत्त कर्मचारी नंदकुमार तांबे (वय ६५) हे सायकलप्रेमी प्रवासात सहभागी झाले. पहिल्या दिवसाचा प्रवास खूप खडतर होता, नंतर दोन घाट चढण होते. याप्रवासात दुसरे वाहन नव्हते. प्रत्येकाच्या सायकलवर १९ ते २० किलो वजन होते. पहिला मुक्काम सातारामध्ये करून एक शहर आणि राज्य पाठीमागे टाकत कन्याकुमारीपर्यंत सर्वजण पोचले. हा प्रवास महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यांतून झाला. स्थानिक लोकांना प्लॅस्टिक न वापरण्याबदल प्रवासादरम्यान जनजागृती केली.

कर्नाटकमधून जाताना दांडेली जंगलातून धाडसी प्रवासाचा अनुभव सर्वांना आला. रस्त्यातून जाताना गोकर्ण मंदिर, मुरूडेश्वर मंदिर व पुढे केरळमधील उत्कृष्ट जुने बांधकाम असलेल्या मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले. काही ठिकाणी समुद्र किनारपट्टी व बेकल किल्ल्याला भेट दिली.

तिरूअनंतपुरममधून शेवटच्या दिवसाचा प्रवास सुरू झाला. पद्मनाथम मंदिरात दर्शन व कन्याकुमारीत प्रवेश केल्यानंतर नारायणपूरच्या दत्त महाराजांचा मठ, असा प्रवास करत १६ नोव्हेंबरला कन्याकुमारीला सर्वजण पोचले. संध्याकाळी स्वामी विवेकानंद स्मारकापुढे थांबून रात्रीचा मुक्काम विवेकानंद केंद्रात झाला. १९ नोव्हेंबरला रेल्वेने परतीचा प्रवास करून २० नोव्हेंबरला संध्याकाळी सर्वजण सुखरूप घरी पोचले.

loading image
go to top