esakal | पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले
sakal

बोलून बातमी शोधा

pavna dam

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : रविवार दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे मावळ तालुक्यातील पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शहराची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे. हवामाना खात्याच्या अंदाजानुसार धरणांच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. धरणाच्या पातळीमध्येही वाढ हाेत आहे. त्यामुळे पवना धरणातून विसर्ग सुरू केला जाऊ शकतो.

पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासह वाघोली परिसर, एम आय डी सी, हिंजवडी आयटी पार्क व मावळ तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवड, एम आय डी सी, हिंजवडी व वाघोली साठी रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जल उपसा केला जातो.

दृष्टिक्षेपात पवना धरण

  1. गेल्या २४ तासात झालेला पाऊस = 29 मिलिमिटर

  2. एक जूनपासून झालेला पाऊस = 2215मिलिमिटर

  3. गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 1595

  4. धरणातील सध्याचा पाणीसाठा = 100 टक्के

  5. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 100 टक्के

  6. गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ

  7. = 0.86 टक्के

  8. - एक जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 68.14 टक्के

हेही वाचा: प्रत्यक्ष मूर्ती पाहून खरेदी करण्याकडे कल

दरम्यान, पवना नदीच्या काठावर पिंपरी चिंचवड मधील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, सांगवी ही गावे आहेत. धरणातून विसर्ग सुरू केल्यानंतर व नदीला पूर आल्यानंतर नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जातो.

दरम्यान, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन दिवसांपूर्वी धरणातील पाण्याचे पूजन केले होते. त्याला महापालिका पक्षनेते नामदेव ढाके यांनी आक्षेप घेतला होता. जलपूजनाचा अधिकार महापौरांचा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मावळ शिवसेना आक्रमक झाली होती. महापौरांना जलपूजन करू देणार नाही. अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शनिवारी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते होणारा जलपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आला.

loading image
go to top