esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

‘स्कूलबस’ धावणार दिवाळीनंतरच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तब्बल दीड वर्षाने शाळा सुरू झाल्या असल्या तरी स्कूल बसची चाके अद्याप रूतलेलीच राहणार आहेत. बस सुरू करण्यासाठी शिक्षण संस्थांनी अद्याप बैठका घेतलेल्या नाहीत, दर ठरविलेले नाहीत. तसेच शाळांमध्ये दिवसाआड विद्यार्थी उपस्थिती आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम यामुळे परिणामी दिवाळी सुट्टीनंतरच बस धावण्याची शक्यता आहे.

शहरात ३ हजार स्कूल बस धावतात. त्यावर काम करणारे सुमारे ४ हजार ५०० चालक व मदतनीस एका फटक्यात बेरोजगार झाले. दीड-दोन वर्षांपासून स्कूल बस बंद असल्याने बस मालकांचे मागील शैक्षणिक वर्षात हाल झाले. या पार्श्‍वभूमीवर, विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.

काही गाड्यांचा फिटनेस, विमा, पीयूसी यांची मुदत संपलेली आहे. बसची चाके रुतल्याने बॅंकेचे हप्ते, आरटीओचे कर आदी खर्च वाढले आहेत. आता शाळा सुरू झाल्याने बस मालकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण ज्या शाळांमध्ये स्कूल बस किंवा खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात तिथे एका सीटवर एक विद्यार्थी अशी आसन व्यवस्था असावी, असे निर्देश दिल्यामुळे मालकांच्या समस्या वाढल्या आहेत. वाहनाची फिटनेस चाचणी करून घेण्यासाठी वेळ लागतो. गाड्यांचे सर्व्हिसिंग, बस मदतनीस यांची जमवाजमव करण्यासाठी पुरेसा वेळही सरकारने दिलेला नाही. यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही स्कूल बस कोरोनापूर्व काळानुसार धावू शकतील, का याबाबत चालकांमध्ये संभ्रम आहे.

मुळात शाळा सुरू झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे विद्यार्थी बसकडे येतील का हा प्रश्‍न आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ६० टक्के असते, तर सहावी-सातवीतील २० टक्के आणि आठवी ते दहावीतील २० टक्के विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांची वाहतुकीचा विसर सरकारला पडल्याचे मत चालकांकडून व्यक्त होत आहे.

loading image
go to top