
कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाले होते. हळूहळू त्यामध्ये शिथिलता आणली. त्यामुळे जनजीवन सुरळीत सुरू झाले. याला अपवाद फक्त नाट्यगृहांचा राहिला. डिसेंबरपर्यंत म्हणजे तब्बल नऊ महिने बंद राहिलेल्या नाट्यगृहांचे पडदे उघडण्यास परवानगी मिळाली.
पिंपरी : नऊ महिन्यांनी रंगमंचाचा पडदा उघडला. नाट्यक्षेत्र खूष झाले. त्यातच महापालिकेने नाट्यगृहांच्या भाडेदरात तब्बल 75 टक्के सवलत जाहीर केली. आता प्रेक्षकांना आस लागली आहे, बहारदार नाट्यप्रयोगांची. जानेवारीअखेरपर्यंत काही नाटकांचे प्रयोग होत आहेत. मर्यादित प्रेक्षकांसमोर सादरीकरण करावे लागणार असले, तरीही प्रत्यक्ष कलाकारांपासून प्रयोग व्यवस्थापकांपर्यंत सर्वजण आनंदले आहेत.
कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाले होते. हळूहळू त्यामध्ये शिथिलता आणली. त्यामुळे जनजीवन सुरळीत सुरू झाले. याला अपवाद फक्त नाट्यगृहांचा राहिला. डिसेंबरपर्यंत म्हणजे तब्बल नऊ महिने बंद राहिलेल्या नाट्यगृहांचे पडदे उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र, या कालावधीत साधारण परिस्थिती असलेल्या कलाकारांसह पूर्णपणे नाट्यव्यवसायावर उपजीविका असलेल्या बॅक स्टेज ते नाट्यप्रयोगांचे व्यवस्थापन या साखळीतील लोकांची आर्थिक घडी विस्कटली.
याबाबतच्या वेदना आणि व्यथा 'सकाळ'ने अनेकवेळा मांडल्या. आता पुन्हा नाटकांना परवानगी मिळाल्यानंतर नाट्यगृहांच्या भाड्यात कपात होण्यासाठी 'सकाळ'ने बातम्यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला. याचीच दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व नाट्यगृहांच्या भाडेदरात तब्बल 75 टक्के सवलत दिली आहे.
हे ही वाचा : पारंपारिक मिश्र व संजीवक शेतीकडे वाटचालीसाठी प्रयत्न; 200 शेतकऱ्यांना कडधान्ये, बियाणांचे केले वाटप
नाट्यक्षेत्रातून स्वागत
महापालिकेच्या निर्णयाचे नाट्यक्षेत्रातून स्वागत झाले आहे. रविवारी (ता. 20) दुपारी साडेबाराला 'मी सावरकर बोलतोय', सायंकाळी साडेसहाला 'सही रे सही', 25 तारखेला दुपारी साडेबाराला 'अयोध्या व्हर्सेस लंका', 27 तारखेला सायंकाळी साडेपाचला 'एका लग्नाची पुढची गोष्ट' अशी नाटक होणार आहेत. तसेच जानेवारीमधील तीन, दहा, पंधरा, चोवीस व अठ्ठावीस या तारखा बुक आहेत.
हे ही वाचा : महाराष्ट्र शासनाच्या महानेट फेज २ या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून कुंभारवळण या एकमेव गावाची निवड करण्यात आली होती.
नाट्यसंस्थांना पाठबळ मिळेल. रसिक व प्रेक्षकांनाही या कोरोना काळात करमणुकीचे साधन उपलब्ध होईल. एकूण या निर्णयामुळे अनेकांच्या समस्या सुटतील.
- गौरी लोंढे -सदस्या, मराठी रंगभूमी परिनिरीक्षण समितीहा निर्णय अपेक्षित होता. दहा महिने कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. या शहरात कलेचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. त्याचाच फायदा झालेला आहे.
- भाऊसाहेब भोईर -अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखापूर्णपणे व्यावसायिक नसलेल्या संस्था आणि स्थानिक कलाकारांना 100 टक्के सूट द्यायला हवी आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात 'सांस्कृतिक निधी' आहे, त्याचा वापर याठिकाणी होऊ शकतो.
- डॉ. संजीवकुमार पाटील - नाट्यकलाकार व नाट्यनिर्मातेअतिशय स्तुत्य निर्णय घेतला आहे. काही नाटकांच्या बुकींगला नाट्यरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- प्रभाकर पवार - नाट्यलेखक व दिग्दर्शकउत्तम निर्णय आहे. नाट्यसंस्थांनी नाटक सुरू असताना प्रेक्षागृहाबाहेर 'डोनेशन बॉक्स' ठेवावा. जेणेकरून जी मदत मिळेल, ती बॅकस्टेज कलाकारांना उपयुक्त ठरेल. तसेच अशाप्रकारे पुढील काळातही नाट्य कलाकारांना सूट द्यावी.
- अमित गोरखे ,अध्यक्ष - कलारंगया निर्णयामुळे हौशी कलाकारांनी नवे बळ मिळणार आहे. हौशी रंगभूमीवर उत्साह निर्माण होईल. अनेकवेळा भाडेदर जास्त असल्यामुळे या कलाकारांना रंगमंच मिळत नव्हता. आता त्यांना तो उपलब्ध होऊ शकतो. नाट्यकलाकारांबरोबरच नाट्यरसिकांची सांस्कृतिक भूक भागवली जाईल.
- संतोष रासने - नाट्यकर्मी व दिग्दर्शकमहापालिकेने भाड्यामध्ये सवलत दिल्यामुळे नाट्यप्रयोगांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. नाट्यनिर्माते, कलाकारांशी बोलून पहिल्या फळीतील कलाकारांच्या मानधनामध्ये कपात करून खर्च कमी करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारनेही वाहनांना टोलमाफी दिली आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे लवकरात लवकर नाट्यव्यवसाय पूर्ववत होण्यास मदत होईल.
- मंदार बापट - मैत्र, नाट्यप्रयोग व्यवस्थापकमहापालिकेने चांगले प्रोत्साहन दिले आहे. पुणे महापालिकेने जे केले नाही, ते पिंपरी-चिंचवडने करून दाखवले. आम्हाला याची गरज होती. आनंद वाटतो. प्रयोग लावण्याचा उत्साह वाढला आहे. हे सगळे टीमवर्क आहे. प्रेक्षकांनीही आता आम्हाला उपस्थिती दर्शवून प्रतिसाद द्यावा.
- मोहन कुलकर्णी - मनोरंजन, संचालक