esakal | चिंचवडमध्ये घरात घुसून धमकी देत लुटला ऐवज 
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये घरात घुसून धमकी देत लुटला ऐवज 

घरात शिरून धमकी देत महिलेकडील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लुटल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिंचवडमधील काळभोरनगर येथे घडली. अविनाश किसन कुसाळकर (वय 27), पवण्या लष्करे (वय 25, दोघेही रा. रामनगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. बाळकृष्ण मोहन मोरे (रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

चिंचवडमध्ये घरात घुसून धमकी देत लुटला ऐवज 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - घरात शिरून धमकी देत महिलेकडील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लुटल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिंचवडमधील काळभोरनगर येथे घडली. अविनाश किसन कुसाळकर (वय 27), पवण्या लष्करे (वय 25, दोघेही रा. रामनगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. बाळकृष्ण मोहन मोरे (रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी रात्री फिर्यादी हे घराच्या खोलीत झोपले होते तर त्यांचे आई-वडील हे बाहेर झोपले असताना घरी आलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना झोपेतून उठविले. त्यांची गचांडी पकडून धमकी देत फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील 35 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व चार हजारांची रोकड असा एकूण 39 हजारांचा ऐवज फिर्यादीच्या आई-वडिलांना धमकी देत जबरदस्तीने काढून घेतला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Edited By - Prashant Patil