पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडीच्या तीन घटना; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

हिंजवडी, दापोडी व कासारसाई येथे घडलेल्या तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी साडे पाच लाखांचा ऐवज लंपास केला. 

पिंपरी : हिंजवडी, दापोडी व कासारसाई येथे घडलेल्या तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी साडे पाच लाखांचा ऐवज लंपास केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कासारसाई येथील घटनेप्रकरणी अमरदीप पोपट बोराडे (रा. उमाजीनगर पाण्याच्या टाकीजवळ, कासारसाई, मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटा घरात शिरला. कपाटातील सोने-चांदीच्या वस्तू व रोकड असा एकूण एक लाख नऊ हजारांचा ऐवज लंपास केला. तर हिंजवडी येथील घटनेप्रकरणी अमित राजेंद्र डांगरे (वय 40, रा. विंडमिल व्हिलेज सोसायटी, बंगला नंबर सी 32, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ बंगला नंबर सी 32 येथे राहतात. 17 नोव्हेंबर दुपारी दोन ते 4 डिसेंबर दुपारी तीन या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून चार लाख 16 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्‍क्‍म चोरून नेली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी यांनी त्यांच्या घरात काम करणारी महिला ज्योती रमेश वरावटे हिच्यावर संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही घटनेचा तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत. तर तिसरी घटना दापोडी येथे घडली. उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने उषाबाई शाहुराज गायकवाड (रा. आबा काटे चाळ, वॉर्ड क्रमांक 5, दापोडी) यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 27 हजारांचा ऐवज लंपास केला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft at hinjewadi, dapodi and kasarasai