esakal | पिंपरी: माहेरच्या मंडळींकडून कुटुंबीयांना मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण

पिंपरी: माहेरच्या मंडळींकडून कुटुंबीयांना मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरू आहे. दरम्यान, किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यावरून पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी पतीसह त्याचे आई, वडील व भावाला बेदम मारहाण केली. ही घटना वाकड येथे घडली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची हजेरी

याप्रकरणी ३४ वर्षीय तरुणाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांची पत्नी, सासू, सासरे, मेहुणा, तीन महिला व तीन चार अनोळखी महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी महिला हे पती-पत्नी असून त्यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा चालू आहे. आरोपी पत्नीचा संपूर्ण खर्च फिर्यादी करत आहेत.

दरम्यान, शनिवारी (ता. ४) फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या कारणावरून रविवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी, त्यांची आई, वडील व भावाला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत धमकी दिली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top