चोरट्यांचा उच्छाद; चिखलीत भरदिवसा साडेतेरा लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

चिखलीतील शिवतेजनगर येथे घडली. 

पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने भरदिवसा घरातून साडेतेरा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना चिखलीतील शिवतेजनगर येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सुमित्रा अमसिद्ध खोत (रा. सेक्‍टर क्रमांक 18, प्लॉट क्रमांक 531, शिवतेजनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी या सोमवारी (ता. 28) सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा ठेवून शेजारी दुसऱ्या घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या होत्या. तेव्हा अज्ञात चोरटा उघड्या दरवाजावाटे घरात शिरला. नऊ लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चार लाखांची रोकड, असा एकूण तेरा लाख 70 हजारांचा ऐवज लंपास केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी काही वेळाने घरी परतल्यानंतर ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. चिखली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह नागरिकांकडे चौकशी केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thirteen and a half lakhs were stolen in chikhali

Tags
टॉपिकस