
भोसरी : शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना ईपॅास यंत्राद्वारे मोफत धान्य वितरण करण्याचे निर्देश शासनाने अन्नधान्य वितरण विभागाला दिले आहेत. त्यामुळे शिधापत्रिका नाही; पण आधारकार्ड आहे, अशांना शिधा मिळेल. मात्र, ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही, अशा नागरिकांना सध्या शिधा मिळणे अवघड होणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना ईपॅास यंत्रावर अंगठा न घेता धान्य वितरीत करण्यात आले. तसेच, शिधापत्रिका नसणाऱ्यांना धान्य वितरणासाठी ईपॅासवर अंगठा घेणे बंधनकारक केले असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची रेशन दुकानदारांनी चिंता व्यक्त केली आहे.
शासनाद्वारे शिधापत्रिका नसणाऱ्या नागरिकांना धान्य मिळावे, यासाठी गेल्या महिन्यात अर्ज भरुन घेतले होते. या महिन्यात या अर्जधारकांना धान्य वितरीत करण्यात येणार आहे. या अर्ज धारकांना मे आणि जून महिन्याचा एकूण दहा किलो तांदूळ आणि दोन किलो हरभरा वितरीत करण्यात येणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना अन्नधान्य वितरीत करण्यासाठी सुरुवातीला कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सुरुवातीला नागरिकांनी ओळखपत्रासाठी आधारकार्डशिवाय अन्य ओळखपत्रे जमा केली होती. त्याचप्रमाणे काही अर्ज आमदार आणि नगरसेवक यांच्या शिफारशीनेही आलेले असल्याची माहिती एका रेशन दुकानदाराने दिली. आता मात्र, शासनाद्वारे आधारकार्ड सक्तीचे केले असल्याने आधारकार्ड नसलेल्या अर्ज धाराकांना शिधा वितरीत करणे अवघड होणार असल्याची माहिती रेशन दुकानदारांनी दिली.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारकांना त्यांचा ईपॅास यंत्रावर अंगठा न घेता धान्य वितरीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका टळलेला नसतानाही शिधापत्रिका नसलेल्या अर्जधारकांना त्यांचा अंगठा ईपॅास यंत्रावर घेऊन धान्य वितरीत करण्याचे आदेश शासनाच्या अन्नधान्य वितरण विभागाद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे वृद्ध नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा ईपॅास यंत्र घेत नाही. त्यामुळे वृद्धांना धान्य वितरित होणार नसल्याचेही रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे.
माझ्याकडे एकूण पाच हजार सहाशे विनाशिधापत्रिकाधारकांचे अर्ज आले आहेत. यापैकी सुमारे अठराशे अर्ज आधारकार्ड विना, आमदार, नगरसेवक शिफारस व अन्य ओळखपत्रे जोडून आलेले आहेत. त्यामुळे या नागरिकांना शिधा वितरीत करणे अवघड होणार आहे. त्याचप्रमाणे ईपॅास यंत्र काही वेळेस बंदही पडते. दिवसभरात जास्तीत जास्त एकशे ऐंशी नागरिकांना ईपॅास यंत्राद्वारे धान्य वितरीत करता येऊ शकते. त्याचप्रमाणे या अर्जधारकाशिवाय शिधापत्रिका धारकांनाही शिधा वितरीत करावी लागते. त्यामुळे सर्व नागरिकंना धान्य वितरीत करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने यावर त्वरित तोडगा काढणे गरजेचे आहे.
- निवृत्ती फुगे, अध्यक्ष, भोसरी विधानसभा रेशन संघटना
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शिधापत्रिका नसलेल्या आणि आधारकार्डशिवाय अर्ज केलेल्या नागरिकांची माहिती एकत्र करून शासनाला कळविली जाईल. शासनाच्या आदेशानंतर अशा अर्जधाराकांना धान्य वितरीत करण्यात येईल. त्याचप्रमाणे वृद्धांच्या अंगठ्याचे ठसे ईपॅास यंत्र घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. याविषयी शासनाला कळविण्यात येईल. धान्य ऑनलाईच वितरीत करावयाचे असल्याने अर्जदारांचा अंगठा ईपॅासवर घेणे अनिवार्य आहे. मात्र, रेशन दुकानदारांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेऊन धान्य वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एखाद्या रेशन दुकानदाराने शिधा वाटपास असमर्थता दर्शविल्यास तेथील अर्जधारकांना अन्य रेशन दुकानदारांकडे शिधा मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल.
- नागनाथ भोसले, नायब तहसीलदार व परिमंडल अधिकारी, फ प्रभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.