esakal | पिंपळे सौदागरात तरुणाला जिवे मारण्याची धमकी; नऊ जणांवर गुन्हा

बोलून बातमी शोधा

पिंपळे सौदागरात तरुणाला जिवे मारण्याची धमकी; नऊ जणांवर गुन्हा}

कराटेचा सराव करताना तेथे थांबलेल्या दोघांना तिथून हाकलून देण्यात आले.

पिंपळे सौदागरात तरुणाला जिवे मारण्याची धमकी; नऊ जणांवर गुन्हा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कराटेचा सराव करताना तेथे थांबलेल्या दोघांना तिथून हाकलून देण्यात आले. त्या रागातून त्या दोघांनी आपल्या साथीदारांना बोलावून एकाला शिवीगाळ करून उद्यानाच्या बाहेर आल्यावर कापून टाकीन अशी धमकी दिली. तसेच एका मुलीला दगड मारून जखमी केले. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. दीपाली नागेश डोणे (वय ३१) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवराम केशव फुलारे (वय २१, रा. रहाटणी चौक), संतोष फुलारे (रा. पिंपळे सौदागर), अभिषेक अनिल चव्हाण (वय २०, रा. रहाटणी) आणि त्यांचे पाच ते सहा अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी शिवराम आणि अभिषेक या दोघांना अटक केली आहे. मंगळवारी (ता.२) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी दीपाली आणि त्यांचे कराटे क्लासमधील मित्र लिनिअर उद्यानमध्ये प्रॅक्टिस करीत होते. त्यावेळी तिथे थांबलेल्या आरोपी शिवराम आणि संतोष यांना फिर्यादी यांनी प्रॅक्टिस करत असलेल्या ठिकाणाहून हाकलून दिले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या रागातून शिवराम आणि संतोष यांनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांचे कराटे कोच जहीर अन्सारी यांना शिवीगाळ करत गेटच्या बाहेर आले कि कापून टाकीन अशी धमकी दिली. माधुरी स्वामी (वय १७) हिला दगड मारून जखमी केले. तसेच सागर जोशी यांना देखील हाताने मारहाण केली. पोलिसांनी शिवराम व संतोष या दोघांना अटक केली आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.