पिंपरी : वकीलाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | Ransom | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
पिंपरी : वकीलाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी : वकीलाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तिघांनी मिळून वकील असलेल्या तरुणाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार चऱ्होली व आळंदी परिसरात घडला.

किसन तापकीर, सतीश तळेकर, लक्ष्मीकांत रासकर (तिघेही रा. वडमुखवाडी, चऱ्होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अ‍ॅड. कैलास विनायक तोंडे (रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे वकील असून २०१७ मध्ये त्यांची लक्ष्मीकांत रासकर यांच्यामुळे किसन ज्ञानोबा तापकीर यांच्याशी ओळख झाली. २०१९ मध्ये किसन तापकीर यांच्याशी किरकोळ कारणावरून फिर्यादी यांचा वाद झाला.

हेही वाचा: पिंपरी : संपादणूक (नॅस) चाचणीत विद्यार्थ्यांची शुक्रवारी परीक्षा

दरम्यान, फ्लॅटच्या उद्घाटनाला आरोपींना बोलावले नाही. त्याचा राग मनात धरून तापकीर यांनी फिर्यादी यांना पैशांसाठी टॉर्चर करण्यास सुरुवात केली. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या मित्रांसोबत भागिदारीत व्यवसाय सुरू केला. त्यामुळे तापकीर यांना पैसे मिळणे बंद झाले. त्यावरून ते फिर्यादी यांना टॉर्चर करत होते. १० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता तापकीर यांनी फिर्यादी यांना फोन करून आळंदी देहूफाटा या ठिकाणी एका हॉटेलवर बोलावले. तेथे हॉटेलमधील एका खोलीत आरोपी दारू पीत असताना फिर्यादी तिथे गेले. तापकीर यांनी त्यांना शिवीगाळ करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच मारहाण केली. 'तू ऑफिस कसे उघडतो' अशी धमकी दिली. पाच गुंठे जागा माझ्या नावावर कर नाहीतर तुला व्यवसाय करू देणार नाही, असे म्हणत फिर्यादी यांना हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास होकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना एका तासानंतर हॉटेलच्या रूममधून सोडून दिले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top