कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगावकरांनी घेतला आज 'हा' महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर आणि स्टेशनच्या मारुती मंदिरात झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

तळेगाव स्टेशन (पुणे) : तळेगावात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत बुधवार (ता. १), गुरुवार (ता. २) आणि शुक्रवारी (ता. ३) पुर्णपणे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (ता. २९) सायंकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रुग्णालय, मेडिकल आणि दुध वगळता सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. रिक्षादेखील बंद राहतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर आणि स्टेशनच्या मारुती मंदिरात झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तळेगावात आजपर्यंत एकूण ३१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते आहे. त्या अनुषंगाने अखेर तळेगावातील जाणकारांनी सर्वसमावेशक बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बैठकीला प्रातिनिधिक स्वरूपात हजर होते. मंगळवारी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करून तीन दिवस घराबाहेर न पडता संपूर्ण लॉकडाउनला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three days of complete lockdown in Talegaon