
भोसरी : शनिवारी (ता. २५) रात्री झालेल्या पावसामुळे भोसरीतील बालाजीनगरातील सुमारे तीनशे, तर लांडेवाडीतील डॅा. बाबासाहेब आंबेडकरनगरातील पंचवीस घरांमध्ये तुंबलेल्या गटाराचे पाणी शिरले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. काही विद्यार्थ्यांची पुस्तकेही पाण्यात भिजली. घरात तीन फुटांपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर जागून काढून लागली. लॅाकडाउनमुळे हाताला काम नाही. त्यातच सरकारने दिलेली शिधाही पावसाच्या पाण्यात भिजल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भोसरी परिसरात शनिवारी संध्याकाळी साडेसहापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीमध्ये नाल्याजवळील संत निरकारी भवनाजवळील सुमारे तीनशे घरांमध्ये गटाराचे पाणी शिरले. घरात पाणी शिरल्याने सूरज सोनवणे यांच्या घरातील फ्रीजसह अन्नधान्याचे नुकसान झाले. किराणा मालाच्या दुकानात पाणी शिरल्याने सत्तर हजारांचे नुकसान झाल्याची माहिती अजिम शेख यांनी दिली. संतोष पोटभरे यांच्या घरातील एलसीडी टीव्ही बंद पडला. कॅंटिनसाठी भरलेल्या सामानाचेही नुकसान झाल्याचे कॅंटिन चालक नागेश वीटकर सांगितले. समीर शेख यांच्या घरातील फर्निचरचे नुकसान झाले, तर शाळेची पुस्तके भिजल्याने अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न प्रदीप डोंगरे, चिंतामणी पुजारी, स्वप्निल पोटभरे, विजय जावळे या विद्यार्थ्यांनी विचारला आहे.नागरिकांनी बालाजीनगरजवळील नाल्यात लावलेली जाळी काढून तुंबलेल्या पाण्यास वाट करून दिली. मात्र, त्यानंतर पहाटे एक वाजेपर्यंत घरातील पाण्याचा निचरा नाल्यामध्ये सुरू होता.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बालाजीनगमध्ये असलेल्या नाल्याची पावसाळ्यापूर्वी योग्य सफाई केली नाही तसेच, नाल्याला जाळी बसविल्याने कचरा अडकून पाणी तुंबले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सरवदे यांनी दिली. ते म्हणाले, की या नाल्यात तीन फुटांच्या तीन पाइप टाकण्यात आल्या आहेत. यापैकी एका पाइपमध्ये माती साचलेली होती. पावसाळ्यापूर्वी या नाल्याची सफाई होणे गरजेचे होते. भीमराव लष्करे यांनी बालाजीनगर जवळील नाल्यात बसवलेली लोखंडी जाळी काढून त्याठिकाणी स्लॅबचा पूल उभारून सीडी वर्क करण्याची मागणी केली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लांडेवाडीतील डॅा. बाबासाहेब आंबेडकरनगररातील नाल्याजवळच्या सुमारे पंचवीस घरांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्य, विद्युत उपकरणे, फर्निचरचे नुकसान झाल्याची माहिती छाया रामचंद्र ससाणे, फातिमा गफूर तांबोळी यांनी दिली. अशीच परिस्थिती इतर घरांमध्येही होती. रात्री साडेआठ वाजता अग्निशमन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या नाल्यात अडकलेला कचरा काढून पाण्यास वाट करून दिली. रात्री अकरा वाजेपर्यंत घरातील पाण्याचा निचरा सुरू होता. सामाजिक कार्यकर्ते राजू ससाणे यांनी सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरजवळ नाल्याला पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी लाइन जोडली आहे. त्याचप्रमाणे या नाल्याजवळ अरुंद पूल असल्याने या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे आलेला कचरा अडकतो. परिणामी पाणी तुंबते व ते वस्तीत शिरते. महापालिकेने या पुलाची रुंदी आणि उंची वाढविली पाहिजे.
जेवणही नाही अन् झोपही गेली
शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरुवात झाली. ही महिलांची जेवण बनविण्याची वेळ असते. काही महिलांनी जेवण बनविले होते. बालाजीनगर आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकरनगरात पाणी शिरल्याने जेवणही पाण्यात गेले. त्यानंतर साडेआठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरू राहिला. नागरिकांनी पावसाच्या पाण्याला वाट करून दिल्यानंतरही सर्व ठिकाणी गाळ पसरलेला होता. त्यामुळे हा गाळ काढण्यासाठी नागरिकांना उपाशीपोटीच रात्र जागून काढावी लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.