चिखलीत घरावर दगडफेक; लाकडी दांडके, कोयत्याने तोडफोड 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

जुन्या भांडणाच्या कारणावरून घरावर दगडफेक करीत लाकडी दांडके, कोयत्यांनी दरवाजा, खिडक्‍यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना चिखली येथे घडली. 

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून घरावर दगडफेक करीत लाकडी दांडके, कोयत्यांनी दरवाजा, खिडक्‍यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना चिखली येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मयूर कांबळे (रा. घरकुल, चिखली), सत्यम राठोड (रा. गल्ली क्रमांक 4, शरदनगर), आदित्य शिंदे, मोन्या लुडेकर (गल्ली क्रमांक 2, शरदनगर), कार्तिक नायडू (रा. नेवाळेवस्ती, चिखली) यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रोहिणी संजय मोरे (रा. जयप्रकाश नारायण सोसायटी, मळेकर उद्यानासमोर, शरदनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या मुलाच्या मित्रांशी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून रविवारी (ता. 20) रात्री पावणे नऊच्या सुमारास आरोपी हातात लाकडी दांडके, कोयते व दगड घेऊन आरडाओरडा करीत फिर्यादीच्या घरासमोर आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरावर दगडफेक करीत लाकडी दांडके व कोयत्यांनी त्यांच्या दरवाजा, खिडक्‍यांच्या काचा फोडल्या. यासह शिवीगाळ केली. दरम्यान, खिडकीवर मारलेला दगड फिर्यादीच्या सासऱ्यांच्या डोक्‍यात लागल्याने ते जखमी झाले. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: throwing stones on house in chikhali crime news