पिंपरी-चिंचवड वेगाने विकसित होण्यामागे होती अण्णासाहेबांची दूरदृष्टी, आज त्यांचा...

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

- पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांचा आज स्मृतिदिन... 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पुष्पहार अर्पण करून गुरुवारी अभिवादन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते नाना काटे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पण, कोण होते, अण्णासाहेब मगर असा अनेकांना प्रश्‍न पडण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी ही पाच गावे मिळून पिंपरी-चिंचवड शहराची निर्मिती पन्नास वर्षांपूर्वी झाली. नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर दहा वर्षांनी लगतची आणखी काही गावे समाविष्ट केली. महापालिका अस्तित्वात आली. या घटनेला 40 वर्षे पूर्ण झाली. शहरात अनेक बदल झाले. विस्तार झाला. गावापासून सुरू झालेली वाटचाल महानगर, स्मार्ट सिटीपर्यंत झाली. नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक जण बाहेरून आले आणि स्थायिक झाले. त्यामुळे शहराच्या निर्मितीसाठी झटलेले अण्णासाहेब मगर यांची आठवण होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आण्णासाहेब मगर यांच्यामुळे 1972 मध्ये नगरपालिका आणि 1982 मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध उद्योग आले. शहराचा विकास इपाट्याने झाला. आज या शहराची ओळख सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून देशात ओळखले जाते. यामागे आण्णासाहेब मगर यांची दूरदृष्टी होती. त्यामुळेच त्यांना पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अण्णासाहेब मगर यांना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, महिलाध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे यांनीही अभिवादन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today is the memorial day of annasaheb magar pimpri chinchwad