‘सामान्यांना परवडणाऱ्या गृह प्रकल्पाचे काम सुरू करा’
वाकड, ता. ४ : नवनगर विकास प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी येथील पेठ क्र. ३० व ३२ मध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी गृहयोजना राबवली आहे. त्यास सहा वर्षे उलटूनही अद्याप ते काम पूर्ण झाले नाही, हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
पुणे महानगर प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. हे काम में. एलोरा कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला अंदाजित किंमत रक्कम ६५ कोटी ८१ लाख १४,३९५ ला ठेका पद्धतीने ७ जानेवारी २०१६ रोजी दिला. त्यास सहा वर्षांचा कालावधी उलटला आहे, तरीही काम पूर्ण झालेले नाही. ही बाब पीएमआरडीएच्या दृष्टीने योग्य नाही. कोरोनाचे दोन वर्षे वगळले तरीही ठेकेदाराचे काम जानेवारी २०१८ पर्यंत पूर्ण होऊन नागरिकांना राहण्यास घर मिळणे आवश्यक होते. परंतु, ही गृहयोजना अद्यापही पूर्ण झालेली नाही.
या विलंबास आपल्या कार्यालयातील जबाबदार अधीक्षक, कार्यकारी, उपअभियंता यांची चौकशी व्हावी, तसेच ठेकेदाराला केव्हापर्यंत मुदतवाढ दिलेली आहे व दिलेल्या ठेक्याची किती किंमत वाढवून दिलेली आहे, याची चौकशी करून ठेकेदार व कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या गृह योजनेची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करून सदनिकांची शासकीय नियमानुसार विक्री करावी म्हणजे शासनास फायदा होईल. तसेच जनतेस परवडणारी घरे किफायतशीर किमतीत उपलब्ध होतील, असे निवेदनात म्हटले आहे.
ही योजना दोन विभागात सुरू आहे. त्यातील एका भागाचे काम अंतिम टप्यात आहे. दुसऱ्या भागातील कामही सुरू आहे. काही तांत्रिक गोष्टींची अडचण होती. लवकरच योजना पूर्णत्वास येईल. सर्व चौकशी करून विलंब करणाऱ्या ठेकेदारवर दंडात्मक कारवाई केली आहे.
- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.