‘संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा’ उपक्रमाअंतर्गत मंदिरे होणार ‘झिरो वेस्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khat
‘संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा’ उपक्रमाअंतर्गत मंदिरे होणार ‘झिरो वेस्ट’

‘संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा’ उपक्रमाअंतर्गत मंदिरे होणार ‘झिरो वेस्ट’

भोसरी : मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत टाकले जात आहे. त्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भोसरीतील प्रभाग क्रमांक पाचमधील मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत न टाकता, त्याचे जागेवरच खत तयार केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागातील मंदिरांना निर्माल्य कलश दिले आहेत. त्यात खतनिर्मिती केली जाणार आहे. प्रभागातील मंदिरे ‘झिरो वेस्ट’ होणार आहेत.(Temples Zero Waste under Sankalp Swachhatecha, Sundar Bhosari initiative)

हेही वाचा: चोरांचा मटणावर डल्ला, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक

हा पर्यावरणपुरक उपक्रम नगरसेवक अजित गव्हाणे (Ajit Gavhane)आणि राजमाता जिजाऊ महिला महासंघाद्वारे हाती घेतला आहे. नगरसेवक गव्हाणे यांनी ‘संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा’ या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण प्रभागात स्वखर्चाने डस्टबीनचे वाटप केले. ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृती अभिमान राबविले. याच उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील मंदिरातील निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे. खतनिर्मितीसाठी मंदिर व्यवस्थापनाला निर्माल्य कंपोस्ट, असे लिहिलेले मोठे रांजण दिले आहेत. प्रभागातील संभाजीनगरमधील संत तुकाराम मंदिर, साई सिद्धनगरमधील तुकाई माता मंदिर, तुकाईनगरतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, स्वामी समर्थ सोसायटीमधील स्वामी समर्थ मंदिर, महादेव नगरमधील महादेव मंदिरात निर्माल्य कलशाचे गुरुवारी (ता. १३) वाटप करण्यात आले. महासंघाच्या अध्यक्षा वैशाली अजित गव्हाणे, अर्चना मोरे, प्रभागातील सर्व महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नगरसेवक गव्हाणे यांनी उपक्रमाची माहिती नागरिकांना दिली. यावेळी गव्हाणे म्हणाले, ‘‘घरातील निर्माल्य नदीपात्रात टाकतो. पण, सार्वजनिक मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत टाकले जात होते. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या. त्यातून निर्माल्याचे खत निर्माण करल्याने मंदिरे ‘झिरो वेस्ट’ होतील.’’(Pimpri chinchwad news)

हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

अशी केली जाणार खतनिर्मिती
निर्माल्य कलशात खाली थोडी कोरडी माती टाकली जाईल. हारांचे दोरे काढले जातील. हार पान-फुलं केळीचे साल बारीक करून कलशात टाकले जाईल. त्यानंतर हळद तसेच दही टाकून त्याचे मिश्रण केले जाईल. त्यानंतर ४५ दिवसात त्याचे कंपोस्ट खत तयार होईल. हे खत बाग, महापालिका उद्यानातील झाडांना टाकले जाणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top