मोशी ग्रामस्थांकडून पोलिसांना बॅरिकेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोशी ग्रामस्थांकडून पोलिसांना बॅरिकेड
मोशी ग्रामस्थांकडून पोलिसांना बॅरिकेड

मोशी ग्रामस्थांकडून पोलिसांना बॅरिकेड

sakal_logo
By

मोशी, ता. १ : येथे महाशिवरात्रीपासून सुरू होणाऱ्या श्री नागेश्‍वर महाराज यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याला वाहतूक नियमनासाठी ५० बॅरिकेड भेट दिले.

मोशीतून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग व तिर्थक्षेत्र देहू-आळंदी बीआरटीएस रस्त्यावरील विविध चौकांमध्ये नेहमीच कोंडी होते. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी बॅरिकेडचा उपयोग होईल. मोशी ग्रामस्थांनी आतापर्यंत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असे उपक्रम राबविले आहेत. ग्रामदैवत श्री नागेश्‍वर महाराज भंडारा यात्रेनिमित्त महाप्रसादासाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून भाविक येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. विविध सण-उत्सव, दर्शन बारी व वाहतूक नियमनासाठी या बॅरिकेडचा उपयोग होईल. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारी, निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक अमरदीप पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिस निरीक्षक गवारी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.