
विहुर रौदं येथे ड्रोन कॅमेराद्वारे शूटिंग करणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल
लोणावळा - कोरोनाचा (Corona) झालेला उद्रेक आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या संकटामुळे बंद केलेली मावळातील पर्यटनस्थळे (Tourism Place) पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुली केली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १० जानेवारीपासून पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाणे असलेले लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंटसह मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळ्यासह ग्रामीण भागातील गड-किल्ले, लेण्या, धरणे आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घातली होती.
हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी लसीकरण नाही
पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांसह नागरिकांचीही वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे शहरी भागासह ग्रामिण भागातील पर्यटनाचा गाडा बंद झाला होता. मावळातील पर्यटन बंदीमुळे लहान-मोठे व्यावसायिक अडचणी आले होते. ग्रामिण अर्थकारणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी मावळातील पर्यटनस्थळे खुली करावीत, अशी मागणी करण्यात येत होती.
कोरोना संसर्गाच्या दरात घट होत असल्याने सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मावळातील पर्यटनस्थळे व तेथील व्यवसाय खुली करण्याचे निर्देश दिले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..