लोणावळा : स्वच्छता कर्मचाऱ्यांना १० लाखांचे विमा संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lonavala Nagarparishad
संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी

लोणावळा : स्वच्छता कर्मचाऱ्यांना १० लाखांचे विमा संरक्षण

लोणावळा - नगरपरिषदेच्या (Lonavala Nagarparishad) वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांना (Sanitation Employee) १० लाखांचे विमा संरक्षण (Insurance Security) देण्यात आले आहे. या विमा पॉलिसीच्या प्रमाणपत्रांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याचबरोबर बॅटरीवर चालणाऱ्या दोन घंटागाड्यांचे लोकार्पण झाले.

लोणावळा नगरपरिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५४ लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या यावेळी सुपूर्द करण्यात आल्या. पंडित दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका मिशन अंतर्गत शहरात १३१ बचत गटांची स्थापना करण्यात आली. यापैकी पंच्याहत्तर गटांना ७५ लाख रुपयांचे कर्ज वाटप होत धनादेशांचे आमदार शेळके यांच्या हस्ते वाटप झाले.

हेही वाचा: विजेवर चालणारी वाहने हेच आपले भवितव्य - उद्योगमंत्री सुभाष देसाई

स्थायी, अस्थायी स्वछता कर्मचाऱ्यांसह शिपायांना पाच वर्षांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या १३७ स्वच्छता कर्मचारी व १७ शिपाई अशा दिडशे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांसाठी या विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे. कर्मचाऱ्याला अपघाती मृत्यू आला तर त्याच्या वारसास मदत मिळणार असून, अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व, तात्पुरते अपंगत्व आल्यास विम्याचा फायदा मिळणार आहे. कर्मचारी शहरातील घनकचरा व्यवस्थापन, साफसफाई करण्याची सेवा करतात. नगरपरिषदेच्या वतीने विमा संरक्षण मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, महिला काँग्रेस शहराध्यक्षा मंजुश्री वाघ, विलास बडेकर, आरोही तळेगावकर, मुकेश परमार, नारायण पाळेकर, राजू बोराटी, संयोगीता साबळे, धनंजय काळोखे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top