Christmas Celebration
Christmas CelebrationSakal

ख्रिसमस सेलिब्रेशन, उत्सव सणाचा -

कोरोनामुळे धाकधूक आणि तणावामध्ये वर्षाची सांगता न होता ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’चा उत्साह बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
Summary

कोरोनामुळे धाकधूक आणि तणावामध्ये वर्षाची सांगता न होता ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’चा उत्साह बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

पिंपरी - कोरोनामुळे (Corona) धाकधूक आणि तणावामध्ये वर्षाची सांगता न होता ‘ख्रिसमस सेलिब्रेशन’चा (Christmas Celebration) उत्साह बाजारपेठेत (Market) पाहायला मिळत आहे. ‘मेरी ख्रिसमस’ची स्टिकर, विविध आकारांतील बेल, विविधरंगी स्टार, घरामध्ये व अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विद्युत माळा, अशा ख्रिसमस स्पेशल साहित्याने बाजारपेठ सजली आहे. ख्रिस्ती बांधवांचा सण म्हणजेच ‘नाताळ’ अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने घराला रंगरंगोटी करणे, आकर्षक सजावट करणे, यासाठी धावपळ सुरू असून, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.

नवीन वर्षाची चाहूल घेऊन येणारा ख्रिसमस हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला, तरी वर्षानुवर्षे तो सर्वांचेच आकर्षण ठरला आहे. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त गेल्या आठवड्यांपासून शहरात उत्साही वातावरण आहे. प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडकर सज्ज झाले असून, शनिवारी (ता. २५) नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. नाताळ जवळ आल्यामुळे ख्रिश्‍चन बांधव घराला रंगरंगोटी करण्यापासून आकर्षक सजावट करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

Christmas Celebration
सांगवी : न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

नाताळनिमित्त आपल्या मुलांना, मित्रांना आकर्षक गिफ्टदेखील देण्यात येते. हा सण अवघ्या आठ दिवसांवर आल्याने बाजारपेठही ख्रिसमस स्पेशल साहित्याने सजली आहे. विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लगबग सुरू आहे. लहानमुलांसाठी सांताक्लॉजची आकर्षक खेळणी, घरामध्ये किंवा अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विविध रंगी शोभेच्या वस्तू, स्टार, विद्युत माळा, मेरी ख्रिसमसची स्टीकर, विविध आकारांतील घंटा, बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यंदा लहानमुलांसाठी खास ख्रिसमस स्पेशल गिफ्टसुद्धा विक्रीसाठी आली असून, त्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.

आकर्षक सांताक्‍लॉज

नाताळची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दुकानासमोर मोठे सांताक्‍लॉज ठेवण्यात आले असून, दुकानाबाहेर विविध आकारांतील लटकविण्यात आले आहेत. बाजारात लहान मुलांसाठी सांताक्‍लॉजची आकर्षक खेळणी, विविध रंगी शोभेच्या वस्तू, स्टार, विद्युत माळा असून बाजारामध्ये उपलब्ध असणारे हे ख्रिसमस स्पेशल साहित्य ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा सांताक्‍लॉजची टोपी, सांतामास्क, चष्मा, हेअरबॅंड, टोप्या घेऊन फिरणारे विक्रेते लहान मुलांचे लक्ष वेधत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com