Crime Against Women
Crime Against Womenfile photo

सांगवी : न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

पिंपरी : जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून तरुणीचे न्यूड फोटो व व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. प्रथमेश ऊर्फ सनी खैरे, स्वराज कदम (दोघेही रा. पिंपळे गुरव) तसेच प्रथमेश याचा अनोळखी मित्र यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित १९ वर्षीय तरुणीने पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर सांगवी पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. (Youth booked for blackmailing girl over video and photo in Pimpri)

आरोपी प्रथमेश खैरे याने तरुणीला बुधवारी ( ता.१५) पिंपळे गुरव येथे बोलावून घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे न्यूड फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर प्रथमेश याचा मित्र स्वराज कदम हा तेथे आला. स्वराज यांने देखील पीडित तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीडित तरुणी सायंकाळी सहाच्या सुमारास तेथून निघून गेली. आरोपींनी रात्री दहाच्या सुमारास पुन्हा फोन करून तरुणीला येण्यास सांगितले. मी येत नाही, असे पीडित तरुणीने सांगितले. त्यावेळी तरुणीचा न्यूड व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याला घाबरून फिर्यादी पीडित तरुणी पुन्हा आरोपींकडे रात्री साडेअकराला पोहोचली. त्यावेळी आरोपी प्रथमेश व त्याच्या अनोळखी मित्राने देखील फिर्यादीची जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. पीडित तरुणीने याप्रकरणी पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर सांगवी पोलिसांकडे बलात्काराचा गुन्हा वर्ग करण्यात आला.

पिस्तूल अंगावर रोखून मागितली खंडणी

चिखलीत धमकावणाऱ्या दोघांवर गुन्हा
पिस्तूल अंगावर रोखून पाचशे रुपयांची मागणी केली. तसेच दरमहा हप्ता न दिल्यास पिस्तुलाने खल्लास करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली. या प्रकरणी मन्नवर सिराजुद्दीन अन्सारी (वय २८, रा. हिमालया बेकरी, अंगणवाडी रोड, मोरेवस्ती, चिखली, मुळ रा. उत्तर प्रदेश) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन शिंदे व कुणाल भंडारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास आरोपी कुणाल भंडारे व नितीन शिंदे हे दोघे एका दुचाकीवरून हिमालया बेकरीत आले. त्यावेळी फिर्यादी हे बेकरीच्या काऊंटरवर होते. आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर पिस्तूल रोखून शिवीगाळ व दमदाटी देखील केली. मला आत्ता ताबडतोब पाचशे रुपये दे, तसेच दरमहा मला हप्ता चालू कर, नाही तर या पिस्तुलाने तुला इथेच खल्लास करून टाकीन, अशी धमकीही आरोपींनी दिली. फिर्यादीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपींवर चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फोटो अश्लील एडिट करून विनयभंग
एकतर्फी प्रेमातून तरुणाने मैत्रिणीचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर पाठवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्मातुउला तोखी (सध्या रा. पुणे, मूळ रा. काबूल, उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीने तरुणीकडे जबरदस्तीने लग्नाचा आग्रह केला. मात्र तरुणीचे दुसऱ्याशी लग्न झाले. त्यानंतर तरुणाने त्याचे व तरुणीचे फोटो एडिट करून अश्लील फोटो तयार केले. ते फोटो सोशल मीडियावर पाठवले. तसेच तरुणीच्या नातेवाइकांना फोन करून बदनामीची धमकी दिली. याप्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. आरोपीने तरुणीकडे लग्नाला आग्रह धरला. दरम्यान, तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न झाले. लग्नापूर्वीच्या ओळखीचा व विश्वासाचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादीची नातेवाइकांमध्ये बदनामी केली. आरोपी व फिर्यादी यांचे फोटो एडिट करून अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर पाठवले. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांना फोन करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यातून झालेल्या मानसिक त्रासामुळे फिर्यादीने पोलिसांत तक्रार केली. सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वाकड पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. (Crime against women in Pimpri)

दुकान फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास (Pimpri Chinchwad crime news)
चिंचवड व पिंपरी येथील दुकान फोडून चोरी केल्याच्या दोन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. कॅलविन एरिक सिम्स (रा. यमुना नगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचे थरमॅक्स चौक चिंचवड येथे दुकान आहे. फिर्यादी यांचे दुकान व शेजारील दोन दुकाने असे तीनही दुकानांचे शटर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी एक
लाख १० हजार ४४० रुपये किमतीचा माल चोरून नेला. यात तांब्याच्या कॉइल्स एक दुचाकी चोरून नेली. तसेच तेथील एका इमारतीमधील एका दुकानाचे शटर वाकवून नुकसान करून चोरीचा प्रयत्न केला. पिंपरीतील घटनेप्रकरणी रिझवान युनूस शेख (रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचे पिंपरी मेन बाजारात कपड्याचे दुकान आहे. अज्ञात चोरटे दुकानाचे शटर उचकटून दुकानात शिरले. दुकानाच्या गल्ल्यातील ६० हजार रुपये चोरून नेले.

तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी
पैशांच्या कारणावरून तरुणाचे अपहरण करून दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही घटना भोसरीतील धावडे वस्ती येथे घडली. माणिक संजय सक्सेना (वय २६, रा. धावडे वस्ती, भोसरी), असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय गेंदराम सक्सेना (वय ५३, रा. अंबाला छावणी, हरियाना) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीणकुमार व ऋषभ (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून आरोपी हे फिर्यादीचा मुलगा माणिक याला जबरदस्तीने घेऊन गेले. अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन माणिक याला ताब्यात ठेवून त्याला सोडविण्यासाठी फिर्यादीकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com