शेतकरी उत्पादक ते निर्यातदार विषयावर पुण्यात उद्या प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी उत्पादक ते निर्यातदार 
विषयावर पुण्यात उद्या प्रशिक्षण
शेतकरी उत्पादक ते निर्यातदार विषयावर पुण्यात उद्या प्रशिक्षण

शेतकरी उत्पादक ते निर्यातदार विषयावर पुण्यात उद्या प्रशिक्षण

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ७ : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, पुणे यांच्या वतीने मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बुधवारी (ता.९) पुण्यात विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकरी उत्पादक ते कृषी निर्यातदार या विषयाचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी दिली.
पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पडवळ यांनी केले आहे. मावळातील शेतकरी वैशिष्ट्यपूर्ण व चांगल्या प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन करीत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची निर्यात केल्यास निश्चितच त्यांना अधिक दर मिळून त्यांच्या निव्वळ उत्पन्नात भर पडणार आहे त्याचबरोबर बेरोजगारी दूर होण्यास मदत होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना निर्यात संधी, विपणन आणि ब्रँडिंग, निर्यात प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणीकरण, कृषी निर्यात अर्थ व्यवस्थापन व कृषी निर्यात योजना याबाबतीत परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. निर्यात क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक तसेच शेतीमाल निर्यात करणारे शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याचे वय हे १८ ते ४० वर्षे असावे व शिक्षण किमान १० वी पास असावे. प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पडवळ यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top