Thur, June 8, 2023

जाचक अटी रद्द करण्याची मागणी
जाचक अटी रद्द करण्याची मागणी
Published on : 22 December 2021, 11:07 am
पिंपरी, ता. २२ : महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या, गृह प्रकल्पातील सोडत काढली असून अपंगांना घरे मिळाली आहेत. मात्र, कागदपत्रांची पडताळणी करताना, रहिवासी प्रमाणपत्र आणि वारस व्यक्तीची नोंदी या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. या जाचक अटी रद्द करण्याची मागणी, प्रहार अपंग क्रांती आंदोलकांच्यावतीने करण्यात आली आहे.
काही अपंगांना कोणीही जवळचे नातेवाईक नाहीत. त्यामुळे त्यांना वारस नोंद करता येत नाही. त्यांना रहिवासी दाखला मिळू शकत नाही. त्यामुळे अटी शिथिल करण्यात याव्यात, अशी मागणी अपंग कल्याण आयुक्तालय, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग सहायक आयुक्त, उपआयुक्त नागरीवस्ती विकास योजना विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.