श्री दत्त सेवा मंडळामध्ये ४० वा दत्तजयंती उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री दत्त सेवा मंडळामध्ये ४० वा दत्तजयंती उत्सव
श्री दत्त सेवा मंडळामध्ये ४० वा दत्तजयंती उत्सव

श्री दत्त सेवा मंडळामध्ये ४० वा दत्तजयंती उत्सव

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : श्रीधरनगर मधील श्री दत्त सेवा मंडळामध्ये ४० वा दत्तजयंती उत्सव साजरा झाला. उत्सवामध्ये अखंड नामजप, प्रभातफेरी, रुद्राभिषेक, संगीत मैफल, पालखी मिरवणूक, कीर्तन, प्रवचन, दत्तयाग या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्ष अनंत दामले, संस्थापक अध्यक्ष अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत हरहरे, वसंत बोरकर, राजेंद्रनाथ गडकरी, श्रीकांत जोशी, संजय भंडारी यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले. प्रकाश पागनीस, अपर्णा कुलकर्णी, मृणालिनी कुलकर्णी, चंद्रशेखर काळकर यांची प्रवचने झाली. कल्याणी कुलकर्णी यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. दत्तयागाचा कार्यक्रम झाला. पौराहित्य वेदमूर्ती श्रीपाद पंढरपुरे यांनी केले. विनय इंगळे, जयंत पानट यांनी दत्तयागाचे यजमानपद भूषविले. सायंकाळी दत्तमहाराज पालखी सोहळा झाला. नगरसेवक शीतल शिंदे व कार्यवाह वसंत बोरकर यांनी पालखीचे प्रस्थान केले.
भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. विश्वास कुलकर्णी यांनी दतजन्माचे कीर्तन सादर केले. यावेळी भाजप शहर प्रवक्ता अमोल थोरात उपस्थित होते. दर्शनासाठी व प्रसादासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. गायक सुयश खटावकर व मंडळी यांची गायन सेवा झाली. संतोष खिंवसरा यांनी प्रसादाचे आयोजन केले. रुद्राभिषेक व भजन व्यवस्था मिनाक्षी आठवले, आशा देशमुख, वंदना महाशब्दे, उज्वला तळेले, श्वेता कुलकर्णी यांनी केली.