हसत-खेळत शिक्षण द्या : डॉ. संजीवकुमार पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हसत-खेळत शिक्षण द्या : डॉ. संजीवकुमार पाटील
हसत-खेळत शिक्षण द्या : डॉ. संजीवकुमार पाटील

हसत-खेळत शिक्षण द्या : डॉ. संजीवकुमार पाटील

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः शिक्षक मुलांचे भवितव्य घडवितो, तर डॉक्टर समाजाचे आरोग्य सांभाळतो. आपल्यातील गुण कौशल्याचा विकास करा. अध्यापनात गायन, अभिनयाचा वापर करून उत्तम सादरीकरण करा. हसत-खेळत शिक्षण द्या. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी मुलांसारखे होऊन उत्तम आत्मविश्वासपूर्वक शिक्षण द्यावे. चारित्र्यशील, कर्तव्यदक्ष, आदर्श नागरिक घडवावे. ध्यानसाधनेतून अज्ञानाचा अंधकार व ज्ञान प्रकाशाने दूर करा, असे प्रतिपादन मनःशक्ती साधना केंद्राचे व्याख्याते डॉ. संजीवकुमार पाटील यांनी कोरोनाकाळातील मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर व्याख्यानमालेत केले.
आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित सरस्वती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सरस्वती शिक्षक व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक, सचिव प्रा. गोविंद दाभाडे होते. यावेळी जितेंद्र पगार, प्राचार्या साधना दातीर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू माळे, पर्यवेक्षिका कोकिळा आहेर, सर्व विभागातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक- सचिव प्रा. दाभाडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले. व्याख्यान मालेचे प्रास्ताविक हर्षा जंगले यांनी तर नंदा पाटील यांनी आभार मानले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागातील शिक्षकांचे सहकार्य लाभले.