पिंपरी-चिंचवडमध्‍ये आज ६६ नवीन रुग्ण | Corona Patients | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona death
पिंपरी-चिंचवडमध्‍ये आज ६६ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्‍ये ६६ नवीन रुग्ण

पिंपरी - कोरोना संसर्ग (Corona Infection) झालेले ६६ रुग्ण (Patients) बुधवारी शहरात आढळले. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्या दोन लाख ७८ हजार ४७१ झाली आहे. आज ७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७४ हजार ३२१ झाली आहे. सध्या ३६२ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील चार हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत २२२ रुग्ण उपचार घेत आहेत. १४० रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. आजपर्यंत २८ लाख ९० हजार ९७६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २४ मेजर व २५३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ७३४ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ७८६ जणांची तपासणी केली.