महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

sakal_logo
By

वैद्यकीय विभागातील २४ जणांच्या बदल्या
तडकाफडकी बदल्या केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी


पिंपरी, ता. २ ः महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी अशा एकूण २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय विभागाकडील रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेच्या दृष्टीने ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ओमिक्रॉनचे संकट असताना अचानक बदल्या केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये ८ रुग्णालये व २८ दवाखाने आहेत. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी यांची रुग्णालयातून रुग्णालयाचे प्रमुख, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडकर यांची तालेरा रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालय प्रमुख, शहर क्षयरोग नियंत्रण विभागाचे कामकाजही त्यांच्याकडे दिले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अलवी सय्यद यांची थेरगाव रुग्णालयातून जिजामाता रुग्णालय, पिंपरीगाव दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाज, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके यांची तालेरा रुग्णालयातून यमुनानगर रुग्णालय प्रमुख, प्राधिकरण दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाजही त्यांच्याकडे असणार आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे यांच्याकडे वैद्यकीय मुख्य कार्यालय व नवीन भोसरी रुग्णालयाची जबाबदारी सोपविली.

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र मंडपे यांची सांगवी रुग्णालयातून थेरगाव रुग्णालय, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा खरात यांची यमुनानगर रुग्णालयातून थेरगाव रुग्णालय, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बांगर यांच्याकडे जिजामाता रुग्णालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे कामकाज सोपविले आहे. ज्येष्ठ वैद्यकीरी डॉ. ऋतुजा लोखंडे यांची पिंपरीगाव दवाखान्यातून जुने भोसरी रुग्णालय प्रमुख, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार यांची भोसरी रुग्णालयातून वायसीएम (राष्ट्रीय कार्यक्रम), ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे यांची वायसीएममधून सांगवी रुग्णालय, फुगेवाडी दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाज दिले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे यांची आकुर्डी रुग्णालयातून जिजामाता रुग्णालयाच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली भामरे यांची जिजामाता रुग्णालयातून पिंपरीगाव दवाखाना, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांची जिजामाता रुग्णालयातून प्राधिकरण दवाखाना, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांची ‘वायसीएम’मधून भोसरी रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पगारे यांची वायसीएममधून भोसरी रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना गांधी यांच्याकडे भोसरी रुग्णालयातील भुलतज्ज्ञ विभागाची जबाबदारी सोपविली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता नांगरे यांची भोसरी रुग्णालयातून तालेरा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल कराळे यांच्याकडे तालेरा रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसूती विभागाचे कामकाज सोपविले आहे. भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे यांच्याकडे तालेरा रुग्णालयातील भुलतज्ज्ञ विभागाची जबाबदारी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास बोरकर यांच्याकडे आकुर्डी रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसूती विभागाचे कामकाज दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज तायडे यांची आकुर्डी रुग्णालयाच्या भूलतज्ज्ञ विभागात बदली केली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीष सूर्यवंशी यांची तालेरा रुग्णालयातून जिजामाता रुग्णालयाचे कामकाज सोपविले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा पोसाणे यांच्याकडे भोसरीऐवजी थेरगाव रुग्णालयाचे कामकाज सोपविले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top