खोदकामात सापडलेला सोन्याचा हार विक्रीसाठी आलेल्यांची पोलिसाला धक्कबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोदकामात सापडलेला सोन्याचा हार विक्रीसाठी आलेल्यांची पोलिसाला धक्कबुक्की
खोदकामात सापडलेला सोन्याचा हार विक्रीसाठी आलेल्यांची पोलिसाला धक्कबुक्की

खोदकामात सापडलेला सोन्याचा हार विक्रीसाठी आलेल्यांची पोलिसाला धक्कबुक्की

sakal_logo
By

अटक करण्यास आलेल्या
पोलिसाला वाकडमध्ये धक्काबुक्की

पिंपरी, ता. १ : खोदकाम करताना सापडलेला सोन्याचा हार विक्रीसाठी आलेल्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी पोलिसाला धक्काबुक्की केली. हा प्रकार वाकड येथे घडला.
याप्रकरणी रितेश माणिक कोळी (रा. मु. पो. सालुब्रे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू मीठा राठोड (वय ३९, रा. बी. आर. नगर, दिवा ईस्ट, ठाणे) व जितेन धर्मा मारवाडी (वय २५, रा. नवघर रोड, गल्ली क्रमांक २, मुलुंड पूर्व, मुंबई) या दोघं पोलिसांनी अटक केली असून, एका महिलेवर गुन्हा दाखल आहे. आरोपी राठोड व मारवाडी यांनी त्यांना नाशिक येथे खोदकाम करताना सापडलेला तीन किलो सोन्याचा हार वाकड येथील एका महिलेला साठ लाख रुपयांना विकण्याचे आमिष दाखविले. तो हार विकण्याचा प्रयत्न करीत असताना संबंधित महिलेने पोलिसांना कळविल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी वाकडमधील ऍटलांटा सोसायटीजवळ सापळा रचला. बुधवारी (ता. २९) रात्री साडे आठच्या सुमारास सोन्याच्या हाराची विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादी यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन आरोपींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top