ऑनलाइन वीजबिल 
भरण्यास ग्राहकांची पसंती

आठ महिन्यांत ३५ हजार ४५३ कोटींचा ऑनलाइन भरणा

ऑनलाइन वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती आठ महिन्यांत ३५ हजार ४५३ कोटींचा ऑनलाइन भरणा

Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १ : महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन वीजबिल भरणा सुविधेला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. आता एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७६ टक्के रकमेचा दरमहा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला असल्याचे समोर आले आहे. तर गेल्या आठ महिन्यांमध्ये एकूण ३५ हजार ४५३ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. तर नोव्हेंबरमध्ये चार हजार ६३६ कोटी रुपयांचा भरणा या सुविधेच्या माध्यमातून मिळाला आहे.

महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी सर्व प्रकारची सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल अॅप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र पोर्टलची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघु व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी दहा हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणचे अधिकृत वेबसाइट तसेच मोबाईल अॅपची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत एकूण १२ हजार ७८९ कोटी ५२ लाखांच्या (५३ टक्के) वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाइन भरणा केला आहे. तर गेल्या नोव्हेंबरमध्ये ग्राहकांनी एका क्लिकवर १६३७ कोटी सहा लाखांचा सुरक्षित भरणा केला आहे.

‘सुविधेचा लाभ वीजग्राहकांनी घ्यावा’
लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास ०.२५ टक्के (५००रुपयांपर्यंत) सूट प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क केला आहे. या सुविधेचा लाभ वीजग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com