धडक देऊन पसार झालेले ''ते'' चालक जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धडक देऊन पसार झालेले ''ते'' चालक जेरबंद
धडक देऊन पसार झालेले ''ते'' चालक जेरबंद

धडक देऊन पसार झालेले ''ते'' चालक जेरबंद

sakal_logo
By

अपघातानंतर पळून जाणारे
दोन वाहनचालक जेरबंद
पिंपरी, ता. २ : दुचाकीचालक व पादचाऱ्यांना धडक दिल्यानंतर त्यांना उपचारासाठी न नेता पळून गेलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेतील दोन वाहन चालकांचा पोलिसांनी कसोशीने शोध घेत, त्यांना जेरबंद केले. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.

थेरगाव येथील बारणे कॉर्नर येथे २८ डिसेंबरला रात्री पावणे अकराच्या सुमारास अनोळखी बसने दुचाकीवरील दोघांना उडविले. त्यानंतर बसचालक पसार झाला. यामध्ये शुभम बबन गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला तर नंदू ज्ञानेश्वर लोखंडे हा जखमी झाला. धडक देणाऱ्या वाहनाची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. केवळ घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या बसच्या रंगावरून पोलिसांनी प्रकाश शामराव बुरंगे (वय २७, रा. वृंदावन कॉलनी, काळेवाडी) याला जेरबंद केले.
तसेच काळेवाडी फाटा येथेही ८ डिसेंबरला अशीच घटना घडली. तीन जणांना धडक देऊन वाहन चालक पसार झाला होता. यामध्ये सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर त्याचे आई -वडील गंभीर जखमी झाले. रात्रीच्या वेळी अपघात झाल्याने सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसत नव्हते. दरम्यान, घटना स्थळावर वाहनाचा आरसा पडल्याचे आढळून आले. त्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला. शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर संशयित सापडला. यावरील चालक तेजस शशिकांत बारस्कर (वय १९, रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला ताब्यात घेतले.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे ) संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, नाईक प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण यांनी केली.

------------------

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top