राष्ट्रीय फ्लाईंग किक स्पर्धेत महाराष्ट्र संघाला १४ सुवर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय फ्लाईंग किक स्पर्धेत
महाराष्ट्र संघाला १४ सुवर्ण
राष्ट्रीय फ्लाईंग किक स्पर्धेत महाराष्ट्र संघाला १४ सुवर्ण

राष्ट्रीय फ्लाईंग किक स्पर्धेत महाराष्ट्र संघाला १४ सुवर्ण

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : दिल्ली येथे झालेल्या फ्लाइंग किक स्पोर्ट्‌स असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे घेण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय फ्लाइंग किक स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण, ८ रौप्य व ३ कांस्य मिळवून पहिले सांघिक पारितोषिक पटकाविले.
१८ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान दिल्ली नजफगड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत भोसरीतील हायब्रॉन स्पोर्टस व मारियम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन कले. स्पर्धेत सात राज्यातील एकूण २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय ज्युडो कोच अजय वस्त, फ्लाइंग किक स्पोर्टसचे अध्यक्ष विजय राव, जनरल सचिव नीरज कुमार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेत रुद्र बुसरे, पार्थ मर्डेकर, यश मापारी, वैदेही चिलप यांना सुवर्णपदक व प्रथमेश शेडबे यांनी रौप्यपदक ३१ ते ३० वजनीगटात मिळवले. अठरा वर्षखालील गटात सार्थक पांचाळ, प्रियदर्शनी बोस, अनुज बुरेवार यांनी सुवर्णपदक व प्रांजल पांचाळ व मुजाहिद शेख यांनी ४१ ते ६० या वजनीगटात रौप्यपदक मिळविले. संघव्यवस्थापक म्हणून नेहा दिवटे, इरफान सय्यद, अजिंक्य पाटोळे यांनी काम पाहिले. विजेत्या खेळाडूंचे सामाजिक कार्यकर्ते रमेश दिवटे, प्रदीप राठोड, सरफराज शेख, मकसूद शेख, मुख्याध्यापिका आफरिन शेख यांनी अभिनंदन केले. सर्व खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
फोटो ः 32382

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top