देहू नगरपंचायत कार्यक्षेत्रात १९ जानेवारीपर्यंत निर्बंध लागू

देहू नगरपंचायत कार्यक्षेत्रात १९ जानेवारीपर्यंत निर्बंध लागू

देहू कार्यक्षेत्रात १४४ कलम
पिंपरी, ता. ५ः देहू नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेअंतर्गत चार प्रभागांसाठी १८ जानेवारीला उर्वरित चार प्रभागांसाठी मतदान होत आहे. नामनिर्देशन प्रक्रियेचे कामकाज देहूगाव येथील वैकुंठ गमन मंदिराशेजारील भक्त निवास येथे चालणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून १९ जानेवारीपर्यंत नगरपंचायत कार्यक्षेत्रात कलम १४४ अन्वये निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी १३ प्रभागांसाठी मतदान झाले झाले आहे. १९ तारखेला एकूण १७ प्रभागांची मतमोजणी होणार आहे.
.........................
सृजन फाउंडेशनतर्फे शालोपयोगी साहित्य
पुणे, ता. ५ः येथील सृजन फाऊंडेशनच्या वतीने मंगळवार पेठेतील समता प्रतिष्ठानमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद भोई, सृजन फाऊंडेशन अध्यक्षा डॉ. अमृता नेवासकर, रणजीत माळवदे, ॲड. रेश्मा उंडाळे , प्राजक्ता अत्रे, सुजाता माळवदे , विनायक नेवासकर, ओंकार अत्रे, तसेच समता फाऊंडेशनचे संदीप मोरे उपस्थित होते.मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आर्थिक मदतीबरोबरच व्याख्याने, प्रशिक्षण, आरोग्य शिबिरांचे आयोजन फांउडेशनतर्फे आयोजित केले जाते.
.............
शिवबा ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम
पिंपरी, ता. ५ ः भोसरी येथील शिवबा ग्रूपच्या सतराव्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये ४०९ जणांना मोफत चष्मे वाटप, फुलेनगर येथील गरजु १५० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, तसेच रस्त्यालगत झोपणाऱ्या ५० जणांना ब्लँकेटचे वाटप केले. १२८ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष विशाल गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते महेश डोंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, इरफान सय्यद, विकास डोळस, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, किशोर गव्हाणे, योगेश लांडगे, सम्राट फुगे, राहुल गवळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com