मावळच्या दुर्गम भागात ‘शिक्षक आपल्या दारी’

मावळच्या दुर्गम भागात ‘शिक्षक आपल्या दारी’

कामशेत, ता. ९ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक ‘शिक्षण आपल्या दारी’द्वारे या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्‍येक वाडी-वस्तीवर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून ते राबत आहेत. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचारपर्यंत विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कामशेतध्ये पहिली ते दहावी अशी निवासी आश्रमशाळा महामार्गालगत कार्यरत आहे. यात खेड, रायगड, मावळ भागातील १०३ विद्यार्थी व ३४३ विद्यार्थिनी निवासी शिक्षण घेत आहेत. प्रामुख्याने ठाकर, कातकरी, महादेव कोळी, फासेपारधी या जमातीचे आदिवासी मुलेमुली शिक्षण घेतात. मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील सर्व शाळा १८ महिने बंद होत्या. दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. परंतु चार जानेवारी २०२२ पासून पुणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग संसर्ग वाढू लागल्याने बंद करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हाच धागा पकडून महर्षी कर्वे आश्रमशाळेतील शिक्षक हे २०२०-२०२१ व परत २०२२ पासून आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून वाडी-वस्तीवर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. आता पुन्हा शाळा बंद झाल्याने ‘शिक्षण आपल्या दारी’ याप्रमाणे वाडी वस्तीवर जाऊन आदिवासी विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून राहावा म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचारपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण पूरक शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे, निगडे, चावसरवस्ती, इनामवस्ती, खांडी येथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना घरी जाऊन धडे दिल्याचा आनंद अधिक होत असल्याचे पंढरीनाथ वाडेकर, प्रेमकला पाठक, राजेंद्र जगताप, गोकूळ खैरनार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com