Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajsakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे फुगेवाडीत लोकार्पण

फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण व नूतनीकरण कामाचे लोकार्पण

जुनी सांगवी : महापालिकेच्या वतीने फुगेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj) सुशोभीकरण व नूतनीकरणाचे लोकार्पण राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद (Rajmata Jijau and Swami Vivekananda) यांच्या जयंतीनिमित्त महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, उपमहापौर हिराबाई घुले महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे नगरसेविका स्वाती काटे, राजू बनसोडे, रोहित काटे,आशा धायगुडे शेंडगे, प्रशांत फुगे, संध्या गायकवाड, उषा वाखारे, विजयकुमार थोरात उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj
देशात कोरोनाचा स्फोट; PM मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

१९९८ मध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. हे काम नेवासा दगडात बांधकाम करण्यात आले असून, ४१ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या सुशोभीकरण कामात धातूमध्ये तयार केलेल्या तलवारी, राजमुद्रा, ढाल, झेंडे वाघनखे, तोफा असे साहित्य सागवानी दर्जाचे दरवाजे असे साहित्य बसवण्यात आले आहे. उर्वरित दोन्ही बाजूस स्टीलचे रेलिंग ग्रिल व ग्रॅनाईट बसविण्यात आलेले आहेत. तसेच बाजूच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. या ऐतिहासिक वास्तूमुळे फुगे वाडीच्या सौंदर्यात भर पडली आहे. प्रास्ताविक स्वाती काटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. प्रशांत फुगे यांनी आभार मानले.(pimpri chinchwad news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com