दुध भेसळ संशयावरून सात लाखांची व्हे पावडर जप्‍त
Sakal

दुध भेसळ संशयावरून सात लाखांची व्हे पावडर जप्‍त

सराईत गुन्हेगाराने परिसरातील काही गुंडांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या गुंडांवर 'मोका' अंतर्गत कारवाई केली.
Published on
Summary

सराईत गुन्हेगाराने परिसरातील काही गुंडांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या गुंडांवर ''मोका''अंतर्गत कारवाई केली.

पिंपरी - सराईत गुन्हेगाराने (Serial Criminal) परिसरातील काही गुंडांविरोधात तक्रार (Complaint) दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या गुंडांवर 'मोका' (Mokka) अंतर्गत कारवाई (Crime) केली. त्यात सराईत गुन्हेगाराने न्यायालयात साक्ष (Evidence) देऊ नये, म्हणून दोघांनी त्याच्यावर खुनी हल्ला (Murderer Attack) केला. ही घटना चिखलीतील स्पाईन रोड येथे घडली.

दुध भेसळ संशयावरून सात लाखांची व्हे पावडर जप्‍त
श्री हनुमान उत्सवानिमित्त तळेगावात विविध कार्यक्रम

अमित अशोक चव्हाण (वय ३१, रा. घरकुल, चिखली) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अशोक बाबूराव चव्हाण (वय ५६) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल पठाण, आकाश मस्के (दोघेही रा. घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमित हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याने परिसरातील काही गुंडांविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी संबंधित गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई केली असून, ते गुंड सध्या कारागृहात आहेत.

दरम्यान, मोकाच्या गुन्ह्यात अमित साक्षीदार असून, त्याने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून आरोपींनी संगनमत करून दोघांनी अमितवर धारदार हत्याराने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला. आरोपी पठाण व मस्के यांच्यावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com